प्रधानमंत्री पिक विमा योजना काय आहे ?
प्रधानमंत्री पिक विमा योजना (Pradhan Mantri Pik Vima Yojana 2024) ही केंद्र सरकारद्वारे 2016 मध्ये सुरू करण्यात आली. हवामानातील अनिश्चितता, दुष्काळ, गारपीट, पूर, वादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून संरक्षण मिळावे यासाठी ही योजना राबवली जाते. प्रधानमंत्री पीक पिमा योजना महाराष्ट्रात 2016 च्या खरीप हंगामापासून राबवण्यात येत आहे.प्रधानमंत्री पिक विमा योजना 2024 मध्ये हि महाराष्ट्र मधील शेतकऱ्याला केवळ १ रुपयात पीक विम्यासाठी अर्ज करता येणार आहे . महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना खूप फायदा होत आहे आणि शेती वरील जोखीम कमी होत आहे.
पिक विमा योजनेचे उद्दिष्टे:
- पिकांच्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण देणे.
- शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवणे.
- शेतीतील जोखीम व्यवस्थापनासाठी उपाय उपलब्ध करून देणे .
- शेतीसाठी शाश्वत आर्थिक स्थैर्य देणे.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या लाभांचे फायदे:
- शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीवर भरपाई मिळते.
- फक्त १ रुपयाच्या प्रीमियम मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजने मध्ये सहभाग घेता येतो.
- ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही प्रकारे शेतकरी अर्ज करू शकतो.
प्रधानमंत्री पिक विमा योजना महाराष्ट्र 2024 कोणत्या पिकांसाठी लागू आहे?
खरीप हंगामातील पिके:
कापूस , सोयाबीन , कांदा, तूर , मूग , उडीद ,मका,तांदूळ
रब्बी हंगामातील पिके:
गहू, हरभरा, ज्वारी
प्रधानमंत्री पिक विमा योजना अर्ज कसा करावा?
प्रधान मंत्री पीक विमा तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन भरू शकता. तुम्हाला पीक विमा भरण्यासाठी आधार कार्ड , पासबुक , जमिनीचा डिजिटल सातबारा , ८ अ आणि पीक पेरा (स्वयंघोषणापत्र) लागेल . तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन फॉर्म कसा भरू शकता.
पीक विमा ऑनलाइन अर्ज प्रक्रिया:
- https://pmfby.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- वेबसाईट ओपन केल्यानंतर फार्मर कॉर्नर ऑप्शन ला क्लिक करा
- खाली guest corner ऑप्शन ला क्लिक करा . त्यानंतर तुम्हाला असा interface दिसेल
- ह्या फॉर्म मध्ये पूर्ण माहिती भरा फॉर्म भरताना तुमच्याकडे आधार कार्ड , पासबुक , ७/१२ पाहिजे
- पूर्ण माहिती भरल्यानंतर तुमचं फार्मर अकाउंट तयार होईल , नंतर पिकाचा तपशील भरून घ्या
- पाससूक , आधार कार्ड , स्वयं घोषणापत्र , जमिनीचा 7/12 हि कागदपत्रे अपलोड करा . आणि फॉर्म सबमिट करा .
पीकविमा भरण्यासाठी महत्वाची कागदपत्रे :
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- स्वयं घोषणापत्र
- जमीन भाडे तत्वावर असेल तर भाडे पत्र
- डिजिटल सात बारा
पीक विमा ऑफलाइन अर्ज प्रक्रिया:
- आपल्या जवळच्या CSC केंद्रात किंवा कृषी कार्यालयात अर्ज भरू शकता .
महत्वाच्या लिंक
पीक विमा भरताना या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा ?
पीक विमा अर्ज भरताना काही महत्वाच्या गोष्टी शेतकऱ्यांना माहिती असणं खूप गरजेच्या आहेत त्या कोणत्या गोष्टी आहेत ते जाणून घेऊया ..
- पीक विमा अर्ज करताना सात बारा व आधार कार्ड वर सारखं नाव आहे का खात्री करून घ्या . सध्या काही प्रॉब्लेम येत नाही पण पुढे चालून हा प्रॉब्लेम येऊ शकतो .
- पीक विमा योजना मध्ये अर्ज करताना शेतात जे पीक आहे त्या पिकाचाच विमा भरा.
- पीक विमा भरल्यानंतर तुम्हाला e -pik पहाणी करणे गरजेचे आहे . e -pik पहाणी खरीप पिकासाठी ऑगस्ट महिना आहे आणि रब्बी पिकासाठी 1 डिसेंबर ते 15 जानेवारी पर्यंत मुदत असते .
- तुम्ही पीक विमा भरला म्हणजे तुम्ही लाभास पात्र असा होत नाही त्यासाठी तुम्हाला आधी पीक पाहणी कारणे गरजेचे आहे . जर तुमच्या शेतमालाचा नैसर्गिक आपत्ती मुळे नुकसान झाले असल्यास तुम्हाला 72 तासाच्या आत तक्रार करणं गरजेचे आहे . तुम्ही तक्रार केल्यानंतर पीक विमा प्रतिनिधी प्रत्यक्ष येऊन पहाणी करेल आणि योजनेच्या नियम नुसार तुम्हाला नुकसान भरपाई मिळेल.
पीक विमा योजनेसाठी किती पैसे लागतात ?
पीक विमा योजनेसाठी शेतकरी स्वतः अर्ज करू शकतात जर तुम्ही स्वतः अर्ज करत असाल तर एका पिकासाठी १ रुपये द्यावे लागतील . पीकविमा तुम्ही अधिकृत वेबसाईट https://pmfby.gov.in/farmerRegistrationForm वर भरू शकता .
या शिवाय तुम्ही आपले सरकार केंद्र (CSC ) च्या माध्यमांनी पीक विमा अर्ज भरू शकता . CSC केंद्रावर अर्ज भरताना शेतकऱ्यांना प्रति अर्ज 1 रुपये शुल्क देणं अपेक्षित आहे . विमा कंपनी CSC चालकांना प्रति अर्ज ४०रुपये देत आहे . पण योजनेसाठी लागणारे कागदपत्र तुमच्याकडं असणे अपेक्षित आहे . डिजिटल सातबारा , ८ अ , आधार कार्ड , पासबुक , पीकपेरा हे सर्व .
पीक विमा विषयी तक्रार कोठे करावी ?
पीक विमा विषयी तुम्हाला काही तक्रार असेल किंवा तुम्हाला आपले सरकार केंद्र (CSC) हे जास्तीचे पैसे मागत असतील तर तुम्ही तक्रार करू शकता
जर तुम्हाला कोणी विमा कंपनी चा प्रतिनिधी मी विमा मंजूर करून देतो म्हणून पैसे मागत असेल तर नक्की तक्रार करा .
टोल फ्री क्रमांक | 14599/14447 |
व्हाट्सअप क्रमांक | 9082698142 |
पीक विमा नुकसान तक्रार कशी नोंदवावी ?
तुमच्या शेतमालाचा नैसर्गिक आपत्ती मुळे नुकसान झाले असल्यास तुम्हाला 72 तासाच्या आत तक्रार करावी लागेल . पीक विमा नुकसान तक्रारी साठी तुमच्याकडं पीक विमा भरलेली पावती लागेल तक्रार करण्यासाठी शेतात जाऊन नुकसान झालेल्या पिकांचे फोटो क्रॉप इन्शुरन्स अँप वर टाकावे लागतील तक्रार केल्यानंतर विमा प्रतिनिधी येऊन पंचनामा करेल आणि तुम्हाला नुकसान भरपाई मिळेल .
क्रॉप इन्शुरन्स अँप | डाउनलोड करा |
प्रधानमंत्री पिक विमा योजना FAQs (वारंवार विचारले जाणारे प्रश्न):
प्रधानमंत्री पिक विमा योजना म्हणजे काय?
प्रधानमंत्री पिक विमा योजना (Pradhan Mantri Pik Vima Yojana 2024) ही केंद्र सरकारद्वारे 2016 मध्ये सुरू करण्यात आली. हवामानातील अनिश्चितता, दुष्काळ, गारपीट, पूर, वादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून संरक्षण मिळावे यासाठी ही योजना राबवली जाते.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेत कसा सहभाग घ्यावा?
तुम्ही pmfby.gov.in या अधिकृत वेबसाइटवर किंवा आपले सरकार केंद्र (CSC )केंद्रात जाऊन अर्ज करू शकता.
योजनेअंतर्गत नुकसान भरपाई कधी मिळते?
तुम्ही पीक विमा तक्रार 72 तासाच्या आत केली असेल आणि पीक पाहणी पण केली असेल तर पीक नुकसान अहवाल जमा झाल्यानंतर 30-45 दिवसांत विमा भरपाई मिळू शकते
प्रधानमंत्री पिक विमा योजना महाराष्ट्रात कोणत्या पिकांसाठी लागू आहे?
महाराष्ट्रातील खरीप पिके (कापूस , सोयाबीन , तांदूळ ,भेइमूग ,बाजरी ,मूग ,उडीद ) रब्बी पिके (ज्वारी ,गहू , हरभरा ) तसेच फळपिके आणि व्यावसायिक पिकासाठी योजना लागू आहे.
जर नुकसान झाले तर कोणाशी संपर्क साधावा?
जवळच्या कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क साधू शकता किंवा क्रॉप इन्शुरन्स या अँप वर तक्रार नोंदवू शकता
पीक विमा 2024 लास्ट डेट काय आहे ?
पीक विमा योजनेमध्ये रब्बी योजनेची लास्ट तारीख 15 डिसेंबर आहे (गहू , हरभरा पिकासाठी )
जर तुम्हाला हि माहिती उपयोगी वाटली असेल , तर ती आपल्या मित्र परिवारासोबत नक्की शेयर करा. आणि आपला व्हॅट्सअँप ग्रुप जॉईन करा .
अधिक माहितीसाठी किंवा अर्ज प्रक्रियेसाठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या .