PM Vishwakarma Yojana 2024 | प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना मराठी

PM Vishwakarma Yojana 2024 : प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १७ सप्टेंबर २०२३ रोजी विश्वकर्मा दिवसाचं मुहर्त साधून सुरु केलेली एक नवीन योजना आहे . देशातील कारागीरांच्या कलेला प्रोत्साहन मिळावे आणी त्यांना आर्थिक मदत करून यांनी आपली कला वाढवावी आणी प्रगती करावी हा पीएम विश्वकर्मा योजनेचा मुख्य हेतू आहे. आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अंतर्गत खासकरून देशातील छोटे कारागीर सुतार, कुंभार ,लोहार हे आर्थिक वर्गामध्ये येतात त्यांच्यासाठी पीएम विश्वकर्मा ही योजना एक वरदान ठरणार आहे. जर तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ घेणार असाल आणी यासाठी काय पात्रता आहे, आणी या योजनेचे फायदे काय आहेत, यासाठी अर्ज कसा करायचा, याची सर्व माहिती या पोस्ट मध्ये दिली आहे.

योजना कॉर्नर ग्रुप Join Now

Table of Contents

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना माहिती | Pm Vishwakarma Yojana Information

योजनेचे नाव प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना
योजना कधी सुरू झाली 17 सप्टेंबर 2023
योजना कोणी सुरू केली मा . प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
योजना सुरू करण्याचे ठिकाण नवी दिल्ली
योजनेचे लाभार्थी लोहार, चांभार, माळी, शिंपी अश्या एकूण 140 जातींना याचा लाभ मिळणार आहे.
योजनेचा लाभ मोफत ट्रेनिंग , सामान खरेदी साठी पैसे , कर्ज , आणि प्रमाणपत्र
अधिकृत वेबसाइट pmvishwakarma.gov.in
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना मराठी 2024

PM Vishwakarma Yojana 2024 – पीएम विश्वकर्मा योजना काय आहे जाणून घ्या ..

भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी नी 17 सप्टेंबर 2023 रोजी प्रधानमंत्री विश्वकर्मा ही योजना सुरु केली.या योजेने अंतर्गत भारत सरकारकडून या योजेसाठी पात्र असलेल्या ना विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाईल, आणी त्यादरम्यान् रुपये 500 रक्कम दिली जाते. तसेच याप्रमाणे विविध प्रकारची कामाची अवजारे खरेदीसाठी रक्कम 15000 एवढी त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजने अंतर्गत नागरिकांना मोफत ट्रेनींग दिले जाते व सोबतच आपला स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी सरकारकडून 5% व्याज दराने रुपये 300000 एवढी रक्कम दिली जाते.ही रक्कम दोन हप्त्यात जमा होते. पाहिला हप्त्यामध्ये 100000 चे कर्ज दिले जाते मग दुसरा हप्ता रुपये 200000 एवढ्या रक्कमेचा असतो.

पीएम विश्वकर्मा योजनेचा उद्देश

भारत देशातील विविध प्रकरच्या जाती जमती सरकारकडून राबवलेल्या योजनेपासून वंचित राहत आहेत, त्यांना कामासाठी योग्य असे प्रशिक्षण दिले जात नाही. त्यामुळे या योजनेचा मूळ उद्देेश हाच की सर्व जातीच्या लोकांना योग्य प्रशिक्षण देणे आणी त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरु करायला कमी व्याज दरात् कर्ज उपलब्ध करून देणे.
या योजनेचे मुख्य कारण असे की, या जातीतील लोकांकडे व्यवसाय प्रशिक्षण घेण्यासाठी पैसे नसतात, परंतु हे जर पक्के कुशल कारागीर असतील तर त्यांना या योजेने अंतर्गत आर्थिक मदत केली जाते.यामुळे ते लोक आर्थिक सक्षम होऊन देशाच्या प्रगतीमध्ये आपले योगदान देऊ शकतात.

पीएम विश्वकर्मा योजनेचे फायदे | Pm vishwakarma yojana benefits

  • अश्याच लोकांना लाभ,ज्यांचा संबध विश्वकर्मा समाजाशी असेल.
  • या योजेने अंतर्गत, लोहार, चांभार, माळी, शिंपी अश्या एकूण 140 जातींना याचा लाभ मिळणार आहे.
  • या योजनेमध्ये एकूण 18 प्रकारच्या पारंपारिक व्यवसायांना कर्ज मिळणार आहे.
  • शिल्पकार, कारागीर यांना प्रमाणपत्र आणी ओळखपत्र दिले जाईल ज्यामुळे यांना एक नवी ओळख मिळेल.
  • या योजनेमध्ये, विश्वकर्मा समाजाला योग्य प्रशिक्षण देऊन आर्थिक स्वरूपात मदत दिली जाते, त्यामुळे ते स्वतःसाठी रोजगार निर्माण करू शकतात.
  • कमीत कमी व्याजदारामध्ये कर्ज मिळवून दिले जाते,त्यामुळे ते स्वतःचा व्यवसायात प्रगती करून आर्थिक सक्षम होतीला आणी देशाच्या अर्थव्यवस्थे मध्ये योगदान् करतील.
  • 7 या योजेने अंतर्गत शिल्पकार, कुशल कारागीर, यांना बँकेशी जोडून त्यांना MSME शी जोडले जाते.

पीएम विश्वकर्मा योजना चा लाभ कोणाला मिळणार | pm vishwakarma yojana eligibility 2024

  • लोहार
  • सोनार
  • चांभार
  • न्हावी
  • धोबी
  • टेलर
  • शिल्पकार
  • कारपेंटर
  • शेती अवजार् निर्माते
  • माळी
  • झाडू, चटाई , बनवणारे.
  • पीएम विश्वकर्मा योजना अंतर्गत 140 जातींना या योजनेचा लाभ मिळणार आहे .

PM Vishwakarma Yojana : आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • मोबाईल नंबर
  • जात प्रमाणपत्र
  • रहिवासी दाखला
  • पासपोर्ट साईझ फोटो
  • बँक अकाउंट पासबुक
  • तुमचे वय 18 पेक्षा जास्त

pm vishwakarma yojana online apply 2024 | पीएम विश्वकर्मा योजना ऑनलाइन अर्ज

ऑनलाईन अर्ज कसा करायचा यासाठी खाली दिलेल्या प्रोसेस सोबत जा.

  • सर्वात आधी तुम्हाला PMVIshwakarma.gov.in या अधिकृत वेबसाईटला जावं लागेल.
  • या वेबसाईट वर तुम्हांला अर्ज करा असे चिन्ह दिसेल यावर तुम्ही क्लीक करा.
  • त्यानंतर तुम्ही आपला युजर आयडी आणी पासवर्ड टाकून सीएससी हे पोर्टल login करा.
  • सगळ्यात आधी तुमचा मोबाईल नंबर आणी आधार कार्ड नंबर टाकून अकाऊंट व्हेरिफाईड करा आणी समोर दिलेल्या माहितीनुसार फॉर्म भरा.
  • काही आवश्यक कागदपत्रे तुम्हाला ऑनलाईन अपलोड करावी लागतील.
  • मग तुंम्हाला पीएम विश्वकर्मा सर्टीफिकेट डाउनलोड देईल ते डाउनलोड करून घ्या.
  • ह्या सर्टीफिकेट मध्ये तुम्हाला डिजिटल एक आयडी येईल, तु तुम्हाला पुढे कामी येईल.
  • यानंतर login करून तुम्ही आपला मोबाईल नंबर टाकून रजिस्टर्ड करा.
  • आता मुख्य अर्ज खुला होईल, त्यामध्ये विविध माहिती अचूक भरून या योजनेसाठी अर्ज करू शकता.

PM Vishwakarma Scheme Admin Login :

या योजनेत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सरकारच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन, तुमचा युजर आयडी, पासवर्ड, टाकून पुढे जा. मग पुढची प्रक्रिया स्टेट लेवल चे अधिकारी आनलाईन करतील.

Pm vishwakarma csc login :

विश्वकर्मा योजनेसाठी CSC login साठी अधिकृत वेबसाईट जाऊन ,तुमचा युजर आयडी, पासवर्ड पूर्ण करू शकता.

पीएम विश्वकर्मा योजना Verification Login:

यासाठी सुद्धा तुम्हाला वेबसाईटला जाऊन login प्रोसेस पूर्ण करावी लागेल, इथे ग्रामपंचायत किंव्हा जिल्हा अधिकारी यांच्याद्वारे केले जाते.

Pm vishwakarma yojana last date 2024 | प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना अर्ज करण्याची शेवटची तारीख

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजने मध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे जर तुम्ही या योजनेमध्ये अर्ज केला असेल तर तुम्हाला नक्कीच लाभ मिळेल .

ज्या लोकांनी या योजने मध्ये सहभाग घेतला नाही त्यांनी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी विश्वकर्मा योजनेच्या अधिकृत वेबसाइट PMVIshwakarma.gov.in वर भेट देऊन माहिती पाहू शकता . जर या योजनेचे काही अपडेट आले तर आम्ही तुम्हाला नक्कीच सांगू .

कोणत्याही योजनेची जलद माहिती साठी तुम्ही आमचा whatsapp ग्रुप जॉइन करू शकता”

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना साठी सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQ’S)

विश्वकर्मा योजना काय आहे ?

विश्वकर्मा योजना केंद्र शासन योजना आहे ही योजना 17 सप्टेंबर 2023 रोजी सुरू करण्यात आली या योजने अंतर्गत लोहार,सोनार,चांभार,न्हावी,धोबी अश्या 140 जातींना फायदा होणार आहे . या योजनेमध्ये कर्ज , प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र तसेच औजार खरेदी साठी 15000 रुपये पण मिळतील .

विश्वकर्मा योजनासाठी कोण पात्र आहे ?

विश्वकर्मा योजनासाठी लोहार,सोनार,चांभार,न्हावी,धोबी ,टेलर,शिल्पकार,कारपेंटर
शेती अवजार् निर्माते,माळी,झाडू, चटाई , बनवणारे.,पीएम विश्वकर्मा योजना अंतर्गत 140 जातींना या योजनेचा लाभ मिळणार आहे .

प्रधान मंत्री विश्वकर्मा योजनेचा काय लाभ आहे ?

प्रधान मंत्री विश्वकर्मा योजने अंतर्गत या योजने मध्ये बसणार्‍या अर्जदारला पूर्ण प्रशिक्षण आणि कामाची औजारे घेण्यासाठी 15000 रुपये दिले जातात तसेच फक्त 5 % व्याजदर ने 300000 रुपये पर्यन्त कर्ज दिले जाते .

प्रधान मंत्री विश्वकर्मा योजने अंतर्गत किती पर्यन्त कर्ज मिळेल ?

प्रधान मंत्री विश्वकर्मा योजने अंतर्गत सर्व पात्र कारागीर , शिल्पकार , टेलर , शिंपी यांना पहिला हप्ता 1 लाख रुपये व दूसरा हप्ता 2 लाख रुपये 5% व्याजदर ने मिळणार आहे .

प्रधान मंत्री विश्वकर्मा योजने चे व्याजदर किती आहे ?

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचे व्याजदर हे 5 % वार्षिक व्याज आहे .

प्रधान मंत्री विश्वकर्मा योजना कधी सुरू करण्यात आली ?

प्रधान मंत्री विश्वकर्मा योजना 17 सप्टेंबर 2023 रोजी सुरू करण्यात आली .

आपल्या मित्रांना शेयर करा ..!

3 thoughts on “PM Vishwakarma Yojana 2024 | प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना मराठी”

Leave a Comment