नमस्कार शेतकऱ्यांनो आजचा हा ब्लॉग Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana सौर कृषी पंपा संबंधात आहे महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांसाठी नेहमीच नवीन नवीन योजना घेऊन येत असते.राज्यातील बरेच शेतकरी पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक पंपाने शेती करतात.पेट्रोल आणि डिझेल इंधनाचे दर लक्षात घेता खूप महाग आहेत या गोष्टी लक्षात घेऊन राज्य सरकाराने शेतकऱ्यांच्या हितासाठी Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana 2024 च्या अंतर्गत सुरू केली राज्य सरकार या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेती संचनासाठी सौर पंप उपलब्ध करून देणार आहे.
राज्य सरकार सौर पंप योजने अंतर्गत पंप किंमतीच्या ९५% टक्के अनुदान शेतकऱ्यांना देते. लाभार्थी शेतकऱ्याकरून फक्त ५% रक्कम खर्च होईल आणी Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana 2024 या यॊजनेमार्फत पंप खरेदी केल्यास् चांगले उत्त्पन्न वाढले जाईल.व कमी पैश्यामध्ये पंप मिळाल्याने आर्थिक नुकसान होणार नाही. हे सौर पंप नवीन तंत्र ज्ञानाने बनवल्यामुळे पर्यावरणाचे प्रदूषण होणार नाही व नैसर्गिक इंधांची खूप बचत होईल. व यासाठी लागणारा खर्च ही वाचणार आहे.
हा विचार लक्षात घेता राज्य सरकारने ही योजना राबवली आहे. महाराष्ट्र सौर कृषी पंप योजनेमुळे सरकारचा जास्त होणारा विजनिर्मिती खर्च वाचला जाणार आहे. व जुने असणारे पंप हे नवीन पंपामध्ये बदल होणार आहेत.या सगळ्यामुळे होणारे प्रदूषण थांबवलले जाईल. सिंचन क्षेत्रासाठी दिले जाणारे अनुदान हे कमी होईल. या सर्व गोष्टींचा विचार करून ही योजाना राबवण्यात आली आहे.
- योजनेचे नाव – Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana 2024:-महाराष्ट्र सरकार कृषी पंप योजना.
- कधी सुरु झाली – 2019
- फायदे – अनुदान देऊन कमी किमतीत सौर पंप
- लाभार्थी – महाराष्ट्रातील शेतकरी
- मंत्रालय – महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड
- अर्ज – महावितरण सोलर पोर्टल ऑनलाईन
Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana: मुख्य वैशिष्टे:-
- शेतकऱ्याने या आधी कोणत्याच योजनेद्वारे कृषी पंपाचा लाभ घेतला नसा नसावा.
- Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana 2024 या योजनेत आदिवासी व अतिदुर्गम भागातील शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य.
- शेतकऱ्याकडे शाश्वत् जलस्रोत जमीन असणे आवश्यक
- पारंपरिक पद्धतीने कृषी पंपासाठी विज न जोडलेले शेतकरी.
- 5 एकर शेत् जमीन असलेल्या शेतकऱ्यास् 3 Hp पंप.
- 5 एकरापेक्षा जास्त शेती असल्यास 5Hp किंव्हा 7.5 Hp सौर कृषी पंप मिळेल.
- पंपातून पाण्याचा प्रवाह विहीर किंवा कुपनलिके चा असावा.
- पंपासाठी पाण्याच्या पाईप ची खोली 60 मिटर पेक्षा जास्त नसावी.
- वनविभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळाले नाही व विज पुरवठा खंडित असलेले गावातील शेतकरी.
- धडक सिंचन योजनेचा लाभ घेतलेले शेतकरी.
- महावितरण कडे विजेसाठी पैसे भरून विज न मिळालेले शेतकरी.
हे सुद्धा पहा – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
Benefits of Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana : सौर कृषीपंपाचे फायदे :-
- महाराष्ट्र शासना तर्फे सौर उर्जेवर चालणारे पंप टप्पानिहाय.
पहिला टप्पा – 25000
दुसरा टप्पा -50000
तिसरा टप्पा-25000 - शेतीपंपास् दिवसाची वीज उपलब्ध
- विज बिलापासून सुटका
- डिझेल च्या तुलनेत zeor खर्च
- पर्यावरण पूरक आहे. प्रदूषण नाही.
- घरगुती विज व औद्योगिक विज ग्राहकांना सबसिडीचा बोजा कमी.
- सोलर पंप बसवल्यानंतर 2 डीसी एल ईडी, मोबाईल चार्जिंग साठी सोकेट आणी एक पंखा.
Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana 2024–योजनेस आवश्यक कागदपत्रे
- जमिनीचा 7/12 आणी 8 अ उतारा
- रहिवासी दाखला
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- ई-मेल
- पासपोर्ट साईझ फोटो
- बँक पासबुक
- हिस्सेदार असल्यास, ना हरकत पत्र
- शपथ पत्र
अर्ज कसा कराल (Benefits of Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana
- महावितरण चे MSEDCL ह्या वेब पोर्टल ला ऑनलाईन भेट द्या.
- Applay बटनावर क्लीक करा.
- सात बारा उतारा एक प्रत लागेल.
- आवश्यक असणारी कागदपत्रे जोडा.( आधार, रहिवासी दाखला
- अर्ज केल्यानंतर् सर्वेक्षाची मागणी क्षेत्रिय् कार्यालयाकडून की जाईल आणी ही यादी जाहीर केली जाईल.
- प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला एस एम एस द्वारे कळवन्यात् येईल
योजनेच्या अटी व शर्ती
- Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana 2024 योजना महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या शेतकऱ्यास लाभ मिळणार.
- राज्याबाहेरील इतरांना लाभ मिळणार नाही.
- याआधी जर शेतकऱ्याने शेतात वीज जोडणी केली असेल आणि विद्युत पंपाचा वापर करत असेल त्यांना सुद्धा याचा लाभ घेता येईल.
- एक शेतकरी हा एकदाच कृषी पंपाचा लाभ घेऊ शकतो.
- कृषी पंपाची देखभाल ही शेतकऱ्याची जबाबदारी राहील, शासन कुठलाही खर्च देणार नाही.
- योजनेचा लाभ घेताना शेतकऱ्याच्या शेतात बोरवेल किंव्हा विहित अथवा शेताजवळ नदी शेततळे, कालवा, असल्याची माहिती महावितरण विभागाला देणे.
- लाभार्थी शेतकऱ्याच्या जमिनीमध्ये जर हिस्सेदार असेल तर त्याचे ना हरकत पत्र आवश्यक आहे.
- जर शेतकऱ्याच्या शेताजवळ जलस्रोत कोणताच नसेल सर्व सौर कृषी पंपाचा लाभ दिला जाणार नाही.
FAQ -योजनेसंबंधी सतत विचारले जाणारे प्रश्न?
प्रश्न– Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana 2024 काय आहे?
उत्तर-विजेमध्ये होणारी कपात आणि वाढते इंधनाचे भाव यामुळे सौर ऊर्जेवर चालणारे पंप शेतकऱ्यांना 95% अनुदान देऊन दिले जाणार आहेत.
प्रश्न– सोलर पंप चे अनुदान किती आहे?
उत्तर-सोलर पंप अनुदान हे 95% आहे, आणि 5% रक्कम शेतकऱ्याने भरायची आहे.
प्रश्न -सोलर च्या मदतीने किती HP पर्यंत चा पंप चालवत येतो?
उत्तर-1 Hp पासून ते 5Hp पर्यंत पंप चालवता येतो.
प्रश्न– पाच एकर शेतीस किती Hp सोलर पंप लागू शकतो?
उत्तर-पाच एकर शेतीस पाण्यासाठी 3Hp पंप पुरेसा आहे.
प्रश्न– मुख्यमंत्री सौर पंप योजनेसाठी अर्ज कुठे करू शकतो?
उत्तर-या योजनेसाठी अर्ज हा महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन करू शकतो.
1 thought on “Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana 2024:- मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना.”