Mahadbt Charging Pump Yojana 2024 |शेतकऱ्यांना मिळणार चार्जिंग फवारणी पंप, मोबाईल वरून करू शकता अर्ज

Mahadbt Charging Pump Yojana 2024 | नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती हा आपला पारंपरिक व्यवसाय आहे. आणि ही शेती करायला आपल्याला बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते. शेतीसाठी लागणाऱ्या उपकरणाची कमतरता यामुळे बऱ्याच वेळा नुकसानीला सामोरे जावे लागते., काही शेतकरी तर उपकरणे ही भाड्याने घेऊन शेती करतात जर शेतकऱ्याकडे स्वतःची योग्य उपकरणे असतील तर त्याला शेतीमध्ये चांगला फायदा होतो.यामुळे शेतीतील शेतकऱ्याची गरज लक्षात घेऊन राज्य शासनाने Mahadbt Charging Pump Yojana 2024 राबवली आहे.

योजना कॉर्नर ग्रुप Join Now

शेतकऱ्यांनी Battery Favarni Pump Yojana मध्ये दिलेल्या 50%अनुदानाचा फायदा घेतला पाहिजे. कारण अगोदर जे स्वयंचलित पंप होते, यामुळे शेतकऱ्यांना काम करताना शारीरिक त्रास जास्त होत असे, परंतु आता Electric Battery pump मुळे हा त्रास नाहीस होणार आहे. यासाठी ची सर्व माहिती आणि अर्ज प्रक्रिया आज बघणार आहोत.

Battery Operated Sprayer Subsidy 2024 : पात्रता काय असावी.

  • शेतकऱ्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
  • शेतीचा 7/12 -8अ उतारा, सोबतच अनु- जाती जमातीमध्ये समावेश असल्याचा दाखला अनिवार्य.
  • अनुदान हे फक्त एकाच यंत्रासाठी मिळेल, शेती अवजार/ ट्रॅक्टर.
  • जर एक अवजारांची अर्ज केला, तर पुढील 10 वर्ष त्यासाठी डबल अर्ज करू शकत नाही, इतर साठी अर्ज करू शकता.
MAHADBT वेबसाईटइथे क्लीक करा
MAHADBT मोबाइल ऍपइथे क्लीक करा
माहिती PDFइथे क्लीक करा
इतर योजनाइथे क्लीक करा
हे सुद्धा वाचा > मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजना 

Mahadbt Charging Pump Yojana 2024 साठी आवश्यक कागदपत्रे.

  • 7/12 उतारा आवश्यक
  • 8अ उतारा आवश्यक
  • आधार कार्ड
  • जातीचा दाखला (अनु,जाती/ जमाती)
  • पूर्वसंमती पत्र
  • घोषणपत्र
  • खरेदी अवजाराचे कोटेशन

Charging Pump Yojana Apply Online : अर्जपद्धती

  1. Mahadbt Charging Pump Yojana 2024 या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रथम तुमचा मोबाइल क्रमांक आधार शी लिंक असला पाहिजे.
  2. योजनेच्या अर्जासाठी वर दिलेल्या वेबसाईटवर वर क्लीक करा आणि शेतकरी योजना पर्यायावर क्लीक करा.
  3. तुम्ही तुमचा अर्ज मोबाईल किंव्हा / ग्राहक सेवा केंद्रातून करू शकता.
  4. अर्ज करा असा पर्याय आल्यावर, बाबी निवड ह्या पर्यायावर क्लीक करा.
  5. समोर एक अर्ज येईल, त्यामध्ये दिलेली माहिती नीट भरा.
  6. कृषी यंत्र औजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हया बटनावर क्लीक करा.
  7. समोर येणाऱ्या तपशील या पर्यायावर क्लीक करून , मनुष्यचलीत ह्यावर क्लीक करा. आणि समोर पीक संरक्षण हा पर्याय क्लीक करा.
  8. आता समोर येणाऱ्या पर्यायापैकी, Battery Favarni Pump हा प्रकार निवडा.
  9. आता योजनेबद्दल अटी व शर्ती मान्य करून जतन करून क्लीक करा.

महत्वाचे : Mahadbt Charging Pump Yojana 2024 साठी तुम्हाला रुपये 23.60 एवढे शुल्क भरावे लागणार , त्यामुळे पेमेंट पर्याय निवडा, समोर अनेक पर्याय दिसतील, तुम्हाला सोपा पर्याय निवडून करायचे आहे. क्यूआर कोड वापरून पेमेंट करू शकता, ही प्रोसेस अगदी सोपी आहे.
मित्रांनो आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल, आपल्या शेतकरी बांधवाना ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा. अश्याच माहितीसाठी Yojana Corner ला भेट द्या.

आपल्या मित्रांना शेयर करा ..!

1 thought on “Mahadbt Charging Pump Yojana 2024 |शेतकऱ्यांना मिळणार चार्जिंग फवारणी पंप, मोबाईल वरून करू शकता अर्ज”

Leave a Comment