Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा शिंदे सरकार तुमच्या साठी आनंदाची बातमी घेऊन आले आहे.महाराष्ट्र राज्यात योजना दूत अंतर्गत तब्बल 50,000 जागांची मेघाभरती निघाली आहे. त्यामुळे नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही उत्कृष्ट संधी आहे.
मित्रांनो जर तुम्हाला मुख्यमंत्री योजना दूत भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर, त्याबद्दलची सर्व माहिती, कागदपत्रे, नियम व अटी या लेखामध्ये सर्व माहिती मिळेल,त्यामुळे हा लेख संपुर्ण काळजीपूर्वक वाचा.
योजना दूत म्हणजे नेमके काय ?
महाराष्ट्र शासन राज्यपातळीवर विविध योजना राबवते ह्या योजनांचा प्रसार करणे, तसेच योजना दूत हे पद योजनांची माहिती ग्रामीण व शहरी जनतेपर्यंत पोहचवणे आणि योजनांची अंमलबजावणी करणे होय. राज्य शासनाकडून जाहीर होणाऱ्या विविध योजना ह्या लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहचवणे हे योजना दूत चे काम आहे.
मुख्यमंत्री योजना दूत भरतीसाठी पात्रता काय असावी
Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024 ह्या पदासाठी शासनाने काही अटी व नियम लागू केले आहेत, यासाठी अर्जदार उमेदवाराने काही अटी पूर्ण करायच्या आवश्यक आहेत.
- वयोमर्यादा : भरतीसाठी अर्जदाराचे वय हे 18 ते 35 पर्यंत असावे. वय बंधन हे उमेदवारास बंधनकारक आहे.
- शैक्षणिक पात्रता : या नोकरीसाठी उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
- डोमासाईल दाखला : अर्जदार उमेदवार हा राज्याचा रहिवासी आहे का ,त्यासाठी डोमासाईल असणे आवश्यक.
- आधार कार्ड : बँक खात्याशी जोडले गेलेले आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
- संगणक ज्ञान : शासनाकडून येणारी माहिती ही ई-मेल च्या माध्यमातून येत असते, त्यामुळे उमेदवारास संगणकबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.
- मोबाइल फोन : माहिती ची देवाणघेवाण होत असल्यामुळे मोबाईल असणे आवश्यक आहे.
Documents For Yojana Dhoot Bharti 2024
Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची यादी खालीलप्रमाणे.
- आधार कार्ड – ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य
- शैक्षणीक प्रमाणात – पदवी शिक्षण पूर्ण असलेले प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- बँक पासबुक – बँक खाते पुस्तक प्रत
- पासपोर्ट फोटो -ओळख म्हणून फोटो
- हमीपत्र – अत्यंत महत्वाचे हमीपत्र जोडणे आवश्यक
योजना दूत पदासाठी वेतन किती मिळणार?
योजना दूत पदभार स्वीकारणाऱ्या व्यक्तीला किंव्हा उमेदवाराला मासिक वेतन हे 10,000 रुपये मिळणार आहे. या पगारामध्येच प्रवासभाडे, भत्ता , आणि इतर खर्च समावेश असेल. उमेदवाराचा नोकरी करार हा सहा महिने इतका असेल, यानंतर तो वाढवला जाणार नाही,आणि या पदानंतर भविष्यात शासकीय कायमस्वरूपी नोकरीची हमी मिळणार नाही.
भरतीचे नाव | मुख्यमंत्री योजना दूत भरती 2024 |
कोनांतर्गत सुरू | महाराष्ट्र सरकार |
नोकरी संख्या | 50,000 हजार |
लाभार्थी कोण | महाराष्ट्रातील उमेदवार |
अर्ज पद्धती काय | ऑनलाईन /ऑफलाईन |
योजनेची मुख्य वैशिष्ट्ये
- Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024 द्वारे ग्रामीण भागातल्या ग्रामपंचायती साठी एक योजनांदूत, आणि शहरातील 5000 लोकांसाठी 1 योजनांदूत अशी 50,000 योजना दूत भरती होणार.
- या योजना दूतास मासिक पगार 10,000 एवढा मिळणार आहे.
- निवड केलेल्या उमेदवार हा 6 महिने करारावर नेमला जाईल,ठरवुन दिलेल्या भागात यांनी काम करावे.
Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024 important Links
योजनेचा GR साठी | येथे क्लीक करा |
व्हाट्स एप साठी | येथे क्लीक करा |
इतर योजना महिती | येथे क्लीक करा |
- Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024 द्वारे नेमणूक केलेल्या योजना दूतांनी खाली दिलेली कामे पार पाडावी
- जिल्हा अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्हानिहाय योजना माहिती नागरिकांना वेळोवेळी देणे.
- योजना दूतांनी शासन राबवत असलेल्या योजनांची माहिती नागरिकांना घरोघरी जाऊन देणे.
- जबाबदारीचे काम असल्यामुळे नेमून दिलेल्या ठिकाणी जाऊन करणे.
- दिवसभर केलेल्या कामाचा तपशील अहवाल शासनाला ओनलाईन अपलोड नियमित करावा.
How to Apply Yojana Doot Bharti 2024 – अर्ज कसा करावा
ही भरती ऑनलाईन च होईल, परंतु, या प्रक्रियेबद्दल अजून कोणतीच माहिती संकेत स्थळावर उपलब्ध नाही, GR मध्ये नमूद केल्याप्रमाणे उमेदवार आपली कागदपत्रे जमा करावी.
महत्वाचे :
मित्रांनो, ही माहिती आपल्या जवळच्या मित्रांसोबत शेअर करा ज्यामुळे त्यांना सुद्धा सरकारी नोकरी मिळण्यास मदत होईल. अश्याच विविध योजना आणि जॉब संदर्भात माहितीसाठी YojanaCorner ला भेट द्या.
FAQ >
योजना दूत भरती द्वारे किती पदे भरली जाणार आहेत
या भरतीद्वारे 50,000 पदे भरली जाणार आहेत
Yojana Door Bharti 2024 साठी अर्ज कसा करावा ?
या भरतीचा अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करता येईल.
ही नोकरी शासकीय आहे का?
ही नोकरी शासकीय नसून, कंत्राटी कामगार पद्धतीने आहे.