Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024 : नमस्कार भगिनींनो तुम्ही जर पदवीधारक असाल तर तुमच्यासाठी उत्तम नोकरीची संधी महिला बाल विकास व एकात्मिक बाल विकास सेवा महाराष्ट्र राज्य अंतर्गत अंगणवाडी मुख्य सेविका भरती 2024 ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. या भरती अंतर्गत 102 एवढी पदे भरली जाणार आहेत. जर कोणी महिला यासाठी अर्ज करणार असेल तर ही महिती उपयुक्त ठरणार आहे.या भरतीबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला या मध्ये वाचायला मिळणार आहे.
Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024 : महिला उमेदवार तुम्हाला यासाठी शिक्षण पात्रता/ वयाचे बंधन / अर्जासंबंधी इतर माहिती तुम्हाला या ब्लॉग मध्ये मिळणार आहे, तसेच महत्वाच्या PDF सुद्धा यामध्ये मिळणार आहेत. त्यामुळे सदर माहीती व पीडीएफ जाहिरात वाचून अर्ज करावा, व अर्जासाठी अधिकृत वेबसाईट लिंक सुद्धा दिलेली आहे.या लिंक वरून तुम्ही तुमच्या भरतीसाठी अर्ज करू शकता.
Anganwadi Sevika Bharti 2024
- भरती विभाग : अंगणवाडी साठी ( सेविका)
- भरती प्रकार : अंगणवाडी मुख्य सेविका भरती यामधून महिला उमेदवारास उत्तम प्रकारची नोकरीची संधी मिळणार आहे.
- श्रेणी : ही भरती महाराष्ट्र राज्य शासना अंतर्गत होणार आहे.
- नोकरी ठिकाण : पात्र महिला उमेदवारास पूर्ण महाराष्ट्र ( आपल्या गावाजवळ) नोकरी मिळणार आहे.
Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024
- पदाचे नाव : या भरतीमधून मुख्यसेविक / पर्यवेक्षक महिला पदे भरली जाणार आहेत
- रिक्त जागा किती : ही भरती 102 महिला उमेदवार पदांसाठी होणार आहे.
- मासिक वेतन : मासिक पगार 35,400 ते 1,12,400 एवढा मिळणार आहे.( अधिक माहितीसाठी PDF खाली दिलेली आहे ती पहा)
- या भरतीसाठी अर्ज करणारी महिला उमेदवार ही महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे
अर्ज पद्धत : महिला उमेदवाराने या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
अर्जाची शुल्क :
खुला ( Open) वर्ग – रुपये 1000 फक्त
मागासवर्गीय ( इतर ) रुपये 900 फक्त
राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर भरती 2024
अंगणवाडी मुख्य सेविका भरती 2024
- या सेविका भरतीसाठी अर्ज करण्याची शेवट दिनांक 03 नोव्हेंबर 2024 ही आहे, त्यामुळे इच्छुक महिलांनी उमेदवारांनी आपला अर्ज लवकर करावा.
- पात्र महिला उमेदवाराची निवड ही लेखी पद्धती परीक्षा घेऊन करण्यात येईल.
- इतर माहितीसाठी खाली पीडीएफ जाहिरात दिलेली आहे ती पाहून घ्या
शैक्षणिक पात्रता – Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदार महिला उमेदवार ही कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त केलेली असावी.
वयोमर्यादा : या सेविका नोकरीसाठी महिलेचे वय 21 ते 38 या दरम्यान असावे.
वयोमर्यादा सूट : फक्त मागासवर्गीय असणाऱ्या महिलांना सूट मिळणार आहे.
आवश्यक कागदपत्रे-
- आधार कार्ड
- जातीचे प्रमाणपत्र
- डोमासाईल दाखला
- पदवीधर प्रमाणपत्र
- संगणक प्रमाणपत्र
Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024 PDF Links
सविस्तर माहितीसाठी महत्वाच्या लिंक खालीलप्रमाणे :-
अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्जासाठी | येथे क्लीक करा |
इतर माहितीसाठी | येथे क्लीक करा |
Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024 Maharashtra : अर्जपुर्वी महत्वाची माहिती वाचा.
- माता भगिनींनो या लेखात काही माहिती अपुरी असू शकते त्यामुळे वर दिलेली pdf जाहिरात पाहू शकता.
- अर्ज करण्यासाठी वर अधिकृत वेबसाईट लिंक दिलेली आहे ती पहा.
- महिला उमेदवार अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करू शकते
- अर्जास विचारलेली आवश्यक कागदपत्रे जोडा, याबद्दल माहिती PDF मध्ये दिलेली आहे.
- या साठी आपला मोबाइल क्रमांक व ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे
अंगणवाडी मुख्य सेविका भरती 2024 ( कामकाज स्वरूप)
१- अंगणवाडी सेविका च्या कामाचे पर्यवेक्षक हे निरीक्षण करतील.
२: 25 अंगणवाडी साठी एक मुख्य पर्यवेक्षक नेमून दिला जाईल.
अ – पर्यवेक्षक हे अंगणवाडी सेविका समवेत कार्यक्रमाची रूपरेषा आखतील.
ब – अंगणवाडी सेविकांच्या समस्यांचे निवारण करणे
क – गावातील कुटुंबाची यादी तयार व इतर मदत करणे
ड – जन्म व मृत्यू नोंदी वेळोवेळी ठेवणे.
3: सेविकांनी अंगणवाडीतील सर्व रजिस्टर व नोंदी खाती तपासून याबद्दल माहिती देने व मासिक अहवाल तयार करून तो सादर करणे.
4 : गाव पातळीवरील इतर जबाबदाऱ्या पार पाडणे .
आज तुम्हाला यामधून अंगणवाडी पर्यवेक्षक भरती 2024 या नोकरी जाहिरातीबद्दल सविस्तर माहिती व PDF जाहिरात आपल्या पर्यंत पोहचवली आहे. जर आपल्या जवळ कोणी पात्र महिला उमेदवार असेल तर ही माहिती त्यापर्यंत पोहचवा ज्याने त्या व्यक्तीस नोकरी मिळू शकते. अश्या नवीन माहिती साठी आपल्या योजना कॉर्नर या वेबसाईट ला भेट द्या,आणि आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा.तुमचे काही प्रश्न असल्यास कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.
Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024