Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024 नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्य सरकार नेहमीच शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना घेऊन येत असते. यामुळे आज आपण अश्याच नवीन योजनेबद्दल आजच्या लेखात माहिती घेणार आहोत, ती म्हणजे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, वीज नेमकी कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार हे जाणून घेऊया.
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना नव्याने सुरू झाली असून, दिनांक 25 जुलै 2024 रोजी या योजनेचा GR प्रसिद्ध झाला आहे. परंतु ही वीज कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार, यासाठी कोणते शेतकरी पात्र असणार आणि ह्या योजनेचा लाभ कसा घेऊ शकता, यासाठीचे नियम व अटी याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.
Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024
योजनेचे नाव – | मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना |
कोनांतर्गत – | उपमुख्यमंत्री अजित पवार |
कधी सुरू झाली – | एप्रिल 2024 |
मुख्य उद्देश – | शेतकऱ्यांना मोफत वीजपुरवठा |
लाभार्थी कोण – | महाराष्ट्रातील शेतकरी |
योजनेबद्दल थोडक्यात माहिती
शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील 47.41 लाख इतके शेतकरी कृषी पंप वापरकर्ते आहेत. या कृषि पंपाना महावितरण मार्फत वीज पुरवठा केला जातो, महावितरण तर्फे बसवण्यात आलेल्या कृषि पंप हे 16 टक्के आहे. यापैकी 30 टक्के वीज ही कृषी पंपासाठी होते. यापैकी शेतकरी 39 हजार 326 लक्ष युनिट वीज वापरतात. शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी रात्री 8 ते 10 तास आणि दिवसासाठी 8 तास थ्री फेज अशी वीज दिली जाते,यामुळे शेतकऱ्यावर वीजभार जास्त पडत असल्यामुळे राज्यातील 44 लाख 3 हजार शेतकऱ्यांना 7.5 HP पर्यंत च्या पंपाना वीज मोफत देणार आहे. या योजनेसाठी 14 हजार 760 कोटी चे अनुदान सरकार देणार आहे.
अधिकृत वेबसाईट | उपलब्ध नाही |
योजनेचा GR | येथे क्लीक करा |
इतर माहिती | येथे क्लीक करा |
राज्यातील ज्या शेतकऱ्यांकडे 7.5 HP कपॅसिटी असलेले कृषी पंप आहेत, अशे अशे शेतकरी या योजनेस पात्र राहतील, शासकीय GR मध्ये ह्या सर्व गोष्टी नमूद केलेल्या आहेत.
Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024
योजनेची ठळक वैशिष्ट्ये-
- Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024 अंतर्गत शेतकऱ्यांना वीज मोफत दिली जाणार आहे.
- कृषी पपं असलेल्या राज्याती 46 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.
- ज्या शेतकऱ्याकडे 7.5 Hp पेक्षा कमी चा पपं आहे तोच शेतकरी पात्र असेल.
- या योजनेकरिता 14 हजार 761 कोटी रुपये अनुदान उपलब्ध होणार आहे.
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा अवधी किती ?
सदर योजना ही पाच वर्षांसाठी राहणार आहे, म्हणजे 2024 ते 2029 पर्यंत राबवली जाणार आहे.परंतु, 3 वर्षानंतर सदर योजनेचे कामकाज पाहून पुढील निर्णय सरकार घेईल.
योजनेची नियम व अटी
- योजनेचा लाभ घेणार शेतकरी हा महाराष्टाचा रहिवासी असला पाहिजे.
- या योजनेमध्ये सहभागी झाल्यास, पूर्वीचे थकीत वीजबिल माफ केले जाणार नाही.
- नमूद केलेल्या पेक्षा जास्त Hp म्हणजे 7.5 पेक्षा जास्त पपं असल्यास वीजबिल माफ होणार नाही.
Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024 Importants Documents.
- आधार कार्ड
- रहिवासी दाखला
- किसान कार्ड
- लाईट बिल
- मोबाइल क्रमांक
- पासपोर्ट साईझ फोटो
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेसाठी अर्जप्रकिया
Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024
शेतकरी बांधवांनो, या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी कोणतीही वेबसाईट सुरू केली नाही, याबद्दल काही नवीन माहिती आल्यास आम्ही तुम्हाला कळवू.
शेतकरी बांधवांनो ही महिती इतर बांधवाना पाठवा, आणि अश्याच नवीन योजना / जॉब च्या माहितीसाठी वरील Whatsapp ग्रुप जॉईन करा.
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा उद्देश काय आहे
7.5 HR पॉवर पेक्षा कमी कृषी पंपाना शेतीसाठी मोफत वीज देणे.
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा उद्देश काय आहे
7.5 HR पॉवर पेक्षा कमी कृषी पंपाना शेतीसाठी मोफत वीज देणे.
महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असून शेतकरी असायला हवा.
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना कोणी कधी सुरू झाली?
ही योजना 25 जुलै रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषित केली